प्रांतअधिकारीनी तहसीलदार यांनी आदेशाने वडगावात कॅम्प घेणार....
अर्ज करूनही दाखले न मिळाल्याने समाजातून नाराजी....
मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून त्यांना दाखले देण्यास प्रशासन वेळ करत असले बाबत वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत तात्काळ निर्णय घेऊन दाखले द्यावेत अशी मागणी पेटवडगाव च्या सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदनाची प्रत हातकणंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना देण्यात आले
महाराष्ट्रामध्ये , संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहेत या आंदोलनामुळे मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडले आहेत यासाठी हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव परिसरातून मराठा समाज बांधवांनी यासाठी अर्ज केले आहेत परंतु शासकीय विभागात अर्ज प्रलंबित आहेत. प्रांत अधिकारी मोसमी चौगुले आणि तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांची भेट घेऊन मागण्यांची निवेदन देण्यात आले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी मराठा बांधवांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ निर्णय घेऊ. असे आश्वासन दिले.त्याचबरोबर वडगाव इथं लवकरच कॅम्प घेण्याचे आश्वासनहि दिले . यावेळी मराठा बांधव विजय अपराध, अभिजीत पाटील, संदीप पाटील,हनमंत पाटील, रोहित यादव, राहूल चव्हाण,वसंत चव्हाण व मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते...