रुकडीत सोमवारी होणार आचार्य विशुद्ध सागरजीसह संघाचे आगमन.......
रुकडी ( प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील रुकडी ता. हातकणंगले येथे सोमवारी आचार्य 108 विशुद्ध सागर जी महाराज यांचे ससंघ आगमन होणार असून या वेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संप्पन होणार आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आव्हान दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
जैन धर्मीय आचार्य १०८ विशुद्ध सागरजी महाराज हे सध्या पश्चीम महाराष्ट्रात ससंघ आपला विहार करत असून शिरोळ तालुक्यातील नांदणी इथं त्यांचा चातुर्मास निश्चीत झाला आहे. आचार्य विशुद्ध सागर जी यांचे रुकडी इथं आगमन होणार हे समजताचं रुकडी सह पंचक्रोशीतील जैन धर्मीयांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता आचार्य श्री संघाचे कुंथुगिरीहून रुकडी नगरीमध्ये प्रवेश होणार आहे. मराठी शाळेजवळ त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे. मंगळवारी सकाळी ६:३० वाजता मंदिरात मूलनायक आदिनाथ तीर्थंकर यांचा पंचामृत अभिषेक , १०:१५ वाजता आहारचर्या , दुपारी ४ वाजता प्रवचन आदी कार्यक्रम संप्पन होणार आहेत.
या वेळी नांदणी मठाचे जगतगुरु जगतपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचेही सांनीध्य लाभनार असून आचार्य विशुद्धसागरजी महाराज यांच्या सह संघस्त २६ मुनी यांचा ही प्रवेश होणार असून सरपंच राजश्री रुकडीकर , उपसरपंच शीतल खोत यांच्यासह सर्व सदस्य व प्रशासनाचेही या साठी विशेष सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचा परीसरातील श्रावक श्राविकांनी पुण्यलाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष रविंद्र डिग्रजे यांनी पत्रकार परिषदेत केले .
या वेळी उपाध्यक्ष शांतीनाथ कोगनोळे , आदीनाथ किणींगे , शितल देसाई , मनोहर पाटील , जयमाला खोत , संघनायक सम्मेद चिंचवाडे , संघनायीका सुवर्णा पाटील , मंगल चिंचवाडे , अमित खोत , शांतीनाथ खोत , रोहन देसाई विधानाचार्य प्रवीण उपाध्ये , संजय खोत , किरण चौगुले , सुदर्शन पाटील यांच्या सह श्रावक श्रावीका उपस्थीत होत्या.