हातकणंगलेतील युवकाचे नैराशेतून वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या....

२७ जून २०२४ -

 हातकणंगलेतील युवकाचे नैराशेतून वारणा नदीत उडी टाकून  आत्महत्या....

कुंभोज ( विनोद शिंगे ) मनासारखी नोकरी मिळत नसल्याने हातकणंगले इथल्या तीस वर्षीय सुशांत शांतिनाथ पाडळकर याने वारणा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली होती.  त्याचा मृतदेह तीन दिवसानंतर आज दुपारी कुंभोज हिंगणगाव दरम्यान नदी पात्रत आढळून आला

याबाबत अधिक माहिती अशी की,- हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथं राहणाऱ्या तीस वर्षीय  सुशांत शांतिनाथ पाडळकर याने मनासारखी नोकरी मिळत नसल्याने मंगळवार दिनांक 25 रोजी सायंकाळी कुंभोज दुधगाव रोडवरील पुलावरून वारणा नदीमध्ये उडी मारली होती. त्याचा मृतदेह आज दुपारी कुंभोज हिंगणगाव दरम्यान नदीपात्रात आढळून आला.  सुशांत याने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पण त्यामध्ये त्याला यश आले नव्हते. तो चांगल्या नोकरीच्या शोधात होता.त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती.त्याने अनेक ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला आठ दहा दिवस झाल्यानंतर तो नोकरी सोडून परत दुसऱ्या ठिकाणी जायचा.तो वैफल्यग्रस्त झाला होता.त्याची मानसिक स्थिती बिघडली होती.  तो सध्या हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीमध्ये चार दिवसापूर्वी कामाला लागला होता. काम आटोपून सायंकाळी घरी आल्यानंतर वडिलांना बाहेर जाऊन येतो असे सांगून आपल्या मोटरसायकल वरून तो कुंभोज इथल्या कुंभोज दुधगाव रोडवरील वारणा नदीच्या पुलावर गेला. तिथून त्याने नदीपात्रामध्ये उडी मारली.  ही घटना मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी पाहिली त्यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला कोण तो आढळून आला नाही. तीन दिवस त्याचा शोध सुरू होता आज दुपारी त्याचा मृतदेह कुंभोज हिंगणगाव दरम्यान नदीपात्रामध्ये तरंगताना आढळून आला.  या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांमध्ये झाली आहे.



एकूण भेटी