शिवणगे येथील युवकाला सायबर गुन्हेगारा कडून 33 हजाराला गंडा
चंदगड प्रतिनिधी/
शिवणगे ता.चंदगड येथील दिनेश महादेव लोहार वय 29 वर्ष याला सायबर गुन्हेगारा कडून 33 हजार
शंभर रुपयाला गंडा घालून सदर युवकाची फसवणूक केली.याबाबत अधिक माहिती अशी की,सदर युवकाला आज सकाळी तुम्ही सातत्याने व्हॉट्सअँप वापरत असलेने तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली असून तुमच्या बँक अकाऊंट वर आम्ही सदर रक्कम पाठवून देतो मात्र इतकी रक्कम आपल्या अकाऊंट वर कोठून आली म्हणून प्राप्तीकर विभाग आपल्यावर धाड टाकेल किंवा तुमच्यावर कारवाई होईल.सदर कारवाई जर नको असेल तर 8 हजार रुपये पाठवा असे सांगितले दिनेश याने 8 हजार शंभर रुपये पाठवले पुन्हा 25 हजार रुपये पाठवा त्यावेळी दिनेशने 5 हजार पाठवले त्यावेळी त्याला धमकावले व पैसे पाठवा अन्यथा कारवाई होईल.या भीतीने दिनेशने गुगल पे वरून पुन्हा 20 हजार रुपये पाठवले. व पुन्हा पुन्हा त्याला पैसे पाठवण्यासाठी धमकवण्यात येत होते.यावेळी दिनेशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.याबाबतची तक्रार सायबर पोलिसात दाखल झाली आहे.