भाजपा मेळावा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी भाजपा पंचायतराज आणि ग्रामविकास विभाग, तसेच निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा बुधवार दिनांक 30 रोजी सायंकाळी पाच वाजता पेठ वडगाव इथल्या लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय ( सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक समोर , कोल्हापूर रोड) या ठिकाणी आयोजित केला आहे. तरी भाजप कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ संजय दादा पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक रानमाळे, तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे.