वसगडेत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस उत्साहात प्रारंभ...

२१ ऑक्टोबर २०२४ -

 दि. 21/10/24

प्रतिनिधी-  हुन प्रदीप येवारे.(वसगडे)



 राजकारणात होणार उलथापालथ...

 वसगडेत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस उत्साहात प्रारंभ...

  वसगडेत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक...

व करवीर तालुक्यातील वसगडे इथल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस फरांडे बाबांच्या भाकणुकीने उत्साहात सुरुवात झाली.

 ➡  रोहिणीला डाज (रिकामे),मिरग साधेल,

    ➡   राजकारणात उलथापालथ होईल,

     ➡  रस भांडे व तांबडे धान्य महाग होणार,

     ➡  रोगराई अशीच राहणार,

     ➡  डोळ्याने बघाल कानाने ऐकाल,

      ➡ धारण दोन सव्वा दोन,

     ➡  माझी सेवा करील त्याला मेवा मिळेल....


   अशी भाकणूक फरांडे बाबा तात्यादेव वायकुळे शिरसाव, ता. भूम, जिल्हा धाराशिव यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत  विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेत केली. भाकणूक व हेडाम  खेळा वेळी भंडाऱ्यांची प्रचंड उधळण करीत भाविकांनी 'विठ्ठल बिरदेवाच्या नावानं. चांगभलं 'च्या गजराने धनगरी ढोलाच्या निनादाने परिसर दणाणून गेला होता.

   सकाळी भाणुस घरातुन यात्रेचे प्रथम मानकरी गाव कामगार पोलीस पाटील  संजय पाटील यांचे हस्ते शस्त्र जोड हत्यार मिरवणुकीने यात्रा कमिटीचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी, सदस्य,मानकरी, पुजारी व धनगर समाज यांचे समवेत मंदिरात येऊन पूजन करण्यात आले.

         त्यानंतर सर्व मानकरी यात्रा कमीटी, सरपंच , उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, समस्त पुजारी धनगर समाज ग्रामस्थ व भावीक मिरवणुकीने फरांडेबाबा विराजमान झालेल्या दगडी गादी जवळ येऊन तेथे तिपगोंडा पाटील यांच्या मानाच्या कांबळीचे पुजन गावकामगार पाटील संजय पाटील यांचे हस्ते करण्यात येवून फरांडे बाबाना शस्त्र व  कांबळी  अर्पण करून मानाचे पानवीडे घेवुन फरांडे बाबाना विठ्ठल बिरदेव दर्शनासाठी सन्मानाने गादीवर भंडारा उधळुन आमंत्रीत केले .

         फरांडे बाबा ढोलांच्या वाद्यासह भंडाऱ्याची उधळण करत मंदीर मार्गावर हेडाम (तलवारीचे पोटावर वार करणे ) नृत्य करत मंडपामध्ये भाकणुक (देववाणी ) सांगुन श्री विठ्ठल बिरदेव चे दर्शन घेतले या महत्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भावीकांनी गर्दी केली होती .

    यात्रेनिमित्य श्री विठ्ठल बिरदेवाची आकर्षक पुजा  आप्पा,खानु, गुड्डांप्पा, संजय, नितीन लक्ष्मण पुजारी यांनी बांधली मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. भंडाऱ्याने संपुर्ण मंदीर परिसर पिवळा धमक झाला आहे.यात्रेमध्ये पुजा साहित्य भंडारा, मेवा मिठाई, खेळणी, यांचे स्टॉल लागले आहेत .

परंपरेप्रमाणे भाकणुकी नंतर फरांडेबाबानी गाव कामगार पोलीस पाटील यांचे घरीमानाची आंघोळ व जेवण करून उपवास सोडला..



यात्रेचा प्रमुख सोहळा पार पाडणेसाठी यात्रा कमीटीचे अध्यक्ष व वसगडेच्या लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी, उपसरपंच अनिता सोनवणे,पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामसेवीका संगिता बिरंबोळे, तलाठी संगीता कोळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच नेमगोंडा पाटील डॉ.श्रीकांत चौगुले, सुदाम सोनवणे, कुलभूषण सुर्यवंशी, रंगा धनगर, शोभाताई राजमाने, धुळगोंडा पाटील, सचिन पाटील, देवस पाटील रावसो झोरे,सुनील पाटील,भुजगोंडा पाटील,विजय पाटील शेरीकर राजगोंडा सुर्यवंशी,धनंजय पटणे,बाबु कांबळे, संजय शिंदे,सुनिल कोळी,नारायण सुर्यवंशी पुजारी, धनगर समाज व ग्रामस्थ,कर्नाटक आणि महाराष्ट्रातून भावीक मोठ्या संखेने उपस्थित होते.तसेच यात्रेमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दिपक जाधव आणी सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


एकूण भेटी