हेरले स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाने महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी हेरले तालुका हातकणंगले येथील हेरले हायस्कूल हेरले मध्ये महात्मा गांधी व कै माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीयांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून मुख्याध्यापक पी आर शिंदे व सफाई कामगार ग्रामपंचायत हेरले यांच्या हस्ते झाले यावेळी परिसरातील स्वच्छता मोहीम घेण्यात आली तसेच ग्रामपंचायतच्या सात सफाई कामगारांचा शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला विद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वागत व प्रस्ताविक शिक्षक एस आर पाटील यांनी केले तर मुख्याध्यापक पी आर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आभार ग्रंथपाल यु आर पाटील यांनी मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, मनोज श्रीपती लोखंडे, राजेश सोळंकी, दिलीप जाधव, सुनील चावरेकर, बायनाबाई लोखंडे, अशा लोखंडे उपस्थित होते.
हेरले स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाने महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
०२ ऑक्टोबर २०२४ -
