भूमी वायु जल अग्नी व आकाश यावर आधारित माझी वसुंधरा अभियानची सुरुवात राज्यात २ ऑक्टोंबर २०२० रोजी झाली.
माझी वसुंधरा अभियान 4.0 या स्पर्धेमध्ये राज्यातील 414 नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था व २२ हजार २९८ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये *२५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात आपल्या वडगाव नगर परिषदेने विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत 50 लक्ष रुपयांचे बक्षीस प्राप्त केले आहे*.
नगरपरिषदेने यापूर्वीही स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये ओडीएफ प्लस प्लस, कचरा मुक्त शहराच्या मानांकनात थ्री स्टार व स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल कामगिरी देखील केलेली आहे.
यावर्षी प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री .सुमित जाधव यांनी शहरातील सर्व नागरिकांना सहभागी करून वृक्षारोपण, वायु प्रदूषण जनजागृती उपक्रम, विद्युत वाहनांचा प्रचार व प्रसार, सायकल ट्रॅक,शहरातील जल स्तोत्र स्वच्छता मोहीम, अपारंपारिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती उपक्रम, जनजागृती स्पर्धा, हरित शपथ, पंचतत्व दर्शविणाऱ्या कलाकृती असे विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले व सर्व वडगाव शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्व उपक्रमांना लाभला.
वडगाव शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, पत्रकार बंधू, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील सर्व सुज्ञ नागरिक या सर्वांच्या सहकार्याने हे यश आपण संपन्न करू शकलो असे मत नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केले.
प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री महादेव सरांबळे, माझी वसुंधरा अभियान नोडल ऑफिसर सौ. सुप्रिया गोडेकर, स्वच्छता निरीक्षक श्री. विशाल धनवडे शहर समन्वयक श्री. शिवम माने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार श्री .शिवराज जाधव तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे.
तसेच येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये वडगाव नगरपरिषदेला अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी असेच योगदान व सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री .सुमित जाधव यांनी केले आहे.