विजेचा करंट लागून रुकडीतील महिलेचा मृत्यू....

२३ सप्टेंबर २०२४ -



 गेटमध्ये करंट नेमका कसा उत्तरला याची चौकशी सुरू......

 अपघात की घातपात..... प्रश्नचिन्ह.....

घराच्या लोखंडी गेटमध्ये उतरलेला करंट बसून 36 वर्षी विवाहित महिला त्रिशीला गिरीष कोळी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रुकडी इथं आज सकाळी घडली.

 याबाबत अधिक माहिती अशी की,- हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या दगडी पूल परिसरात गिरीश कोळी हे आपली पत्नी आणि मुलांच्या सह राहत होते. गिरीश यांची नऊ वर्षाची मुलगी आजारी असल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्रिशाला कोळी या घरातील कामे आटोपून दवाखान्यामध्ये मुलीकडे जाणार होत्या. काम आटोपून त्या दुसऱ्या मजल्यावर गेट उघडून वर जात असताना अचानक गेट मध्ये उतरलेल्या वीजेच्या प्रवाहामुळे त्या गेटला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात ९ वर्षांची मुलगी , पती , आई , वडील , भाऊ असा परीवार आहे घटनास्थळी महावितरणच्या जिल्हा विद्युत निरीक्षक मीरा पाटील यांनी सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केल्या असता कोळी यांच्या सह शेजारील मंगल आण्णासो कांबळे यांच्या घरातील गेटलाही करंट असल्याचे निदर्शनास आले. गेट मध्ये नेमका करंट कशामुळे उतरला हे शोधण्याचे काम उशीरा पर्यंत महावितरणचे कर्मचारी करत होते. या घटनेची माहीती सामाजीक कार्यकर्ते अनिल बागडी- पाटील यांनी हातकणंगले पोलीसांना दिली असता बीट अंमलदार सुरजानंद चव्हाण यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.

एकूण भेटी