जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत किणी हायस्कूल अजिंक्य: किणी , ता.२०: किणी हायस्कूल किणीच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने चंदगडच्या संघाचा 14 गुणांनी पराभव करून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. विभागीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. त्यांना अध्यक्ष आ .शा .पाटील, उपाध्यक्ष सुनील कदम, सचिव राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक बी.डी मलगुंडे पर्यवेक्षक डी .डी चव्हाण क्रीडा शिक्षक एस .के धनवडे ,पी.एन .पाटील अभिजीत पाटणे व इम्रान अरब यांचे मार्गदर्शन लाभले.